शिक्षकदिन
आज शिक्षकदिन... अस काही नाहीय की विद्यार्थ्याला फक्त शिक्षकदिनीच आपल्या शिक्षकांची आठवण यावी, खरा विद्यार्थी हा आपल्या आयुष्यात झालेल्या आमूलाग्र बदलांसाठी नेहमीच शिक्षकांचा ऋणी असतो हे अगदी अस आहे की गणेशोत्सव असला की आपण जल्लोष करतो अन् आभार मानतो गणरायाचे दिलेल्या आयुष्यासाठी पण गणपतीची आपण कायमच आठवण काढत असतोच ना...
शिक्षकदिन आजही आठवणीत राहतोय याच सर्वस्वी कारण तुम्ही आहात सर... आज समजतंय की त्या वयात कळत नकळत आपल्या आईवडिलांशी मतभेद होत असतात, आणि तेव्हा जे शिक्षक तुम्हाला समजून तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत आयुष्याला योग्य दिशा दाखवतात त्यांच्याप्रती एक वेगळीच आपुलकी निर्माण होते जशी माझी तुमच्या प्रती आहे... आजही शिक्षकदिन म्हणजेच ५ सप्टेंबर आणि शिक्षक म्हणजे चोभे सर आणि कळमकर सर ही संकल्पना नेहमीच मनात होती, आहे आणि राहील...
धन्यवाद बोलून ऋण फेडू शकत नाही पण येवढं नक्की आहे की आजन्म उपकृत नक्कीच राहू शकतो...
शिक्षकदिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Comments
Post a Comment