शोध विजयाचा !!!

         आपणा सर्वांना ठाऊक च आहे की क्रिकेट आणि रसिक हे नात कायमच एक विलोभनीय राहिलय आणि त्यातल्या त्यात विश्वचषक स्पर्धा म्हणजे तर क्रिकेट शौकिंनासाठी एक पर्वणीच...
          सर्वांना माहीतच आहे की भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली १९८३ चा विश्वचषक  जिंकला होता, परंतु म्हणतात ना ध्येयापेक्षा ध्येय गाठण्याचा प्रवास खूपच सुखावणारा असतो.
           आज मी हाच भारताचा विश्वविजेता होण्याचा प्रवास आपणासमोर मांडू इच्छितो....
          सर्वप्रथम विश्वचषक हा १९७५ ला खेळवण्यात आला त्या वर्षी वेस्ट इंडिज ने विश्वविजेतेपदाचा मान मिळवला त्यानंतर १९७९ याही वर्षी विश्वविजेतेपद वेस्ट इंडिज ने पटकावत आपला क्रिकेट वरील दबदबा सिद्ध केला. 
        आता वर्ष होत १९८३, मागील अनुभव बघता वेस्ट इंडिज संघाला विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते. तर भारताला कमजोर संघ म्हणण्यात कुणी कसर करीत नव्हत कारण संघाची कामगिरी मागील दोन्ही विश्वचषकात पुरेशी समाधानकारक नव्हतीच. 
        विश्वचषक ९ जून ते २५ जून १९८३ या कालावधीत खेलवण्याच नक्की झालं होत. यावर्षी विश्वचषकामध्ये आठ संघ भाग घेणार होते जे की वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, भारत आणि झिंबांब्वे हे होते. संघांची दोन भागात विभागणी केली गेली होती. एका भागामध्ये इंग्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांचा समावेश होता तर दुसऱ्या भागामध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, भारत आणि झिंबाब्वे हे होते. सदर सामने हे ६० षटक प्रती संघ असे होणार होते. त्यावेळी विश्वचषकासाठी पांढरे कपडे घातले जात होते व लाल चेंडू वापरण्यात येणार होता...
           भारताचा सुरुवातीचा सामना हा बलशाली वेस्ट इंडिज विरुद्ध ११ जून रोजी ठरला... ठरल्याप्रमाणे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सर्वप्रथम नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने भारताला फलंदाजी साठी पाचारण केले. भारताने प्रथम फलंदाजी करताना यशपाल शर्मा यांच्या ८९ धावांच्या मोबदल्यात २६२ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिज समोर ठेवले. त्यावेळी ते आव्हान वेस्ट इंडिज ला पेलवले नाही व त्यांचा संघ २२८ धावांवर गारद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले.
         भारताचा दुसरा सामना हा दुबळ्या झिंबाब्वे संघाविरुद्ध होता. तो एकतर्फी सामना भारताने ५ गडी राखून जिंकला. सामन्याचे आकर्षण ठरले भारताचे भेदक गोलंदाज मदनलाल आणि रॉजर बिन्नी....
       संघाची तिसरी लढत की ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाबरोबर होती आणि ते त्यांनी त्यांच्या खेळातून दर्शवल पण... भारतासमोर ३२० धावांचे लक्ष्य उभे केले. त्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा १५८ धावांतच धुव्वा उडाला... 
         पुढील सामन्यात पुन्हा एकदा वेस्ट इंडिज संघ नव्या दमाने आणि विजयाचा महामेरू घेऊन मैदानात उतरला. व्हिव रिचर्ड्स यांनी भारतीय गोलंदाजांनी पळता भुई थोडी करत शतकिय खेळी केली त्याबळावरच भारतीय संघासमोर २८२ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. पण भारत रॉबर्ट्स, होल्डींग आणि माल्कम मार्शल यांच्या माऱ्यापुढे फार काळ तग धरू शकला नाही. भारताचा २१६ धावांत खुर्दा झाला...
        पण या कसोटीच्या काळात भारतीय संघाने मनोबल खचू न देता झिंबाब्वे ला हरवत आपल स्थान निर्माण केलं आता भारताने ५ पैकी ३ सामन्यामध्ये यश मिळवलं होत पण पुढचा सामना जिंकण गरजेचं होत आणि ते ही ऑस्ट्रेलिया ला हरवत... 
          भारताने प्रथम फलंदाजी करताना २४७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया समोर ठेवले. पण मदनलाल आणि रॉजर बिन्नी यांच्या माऱ्यापुढे त्यांचा डाव १२९ धावांत संपुष्टात आला.
अशा रीतीने भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला होता पण...
           पण समोर आव्हान होते ते खेळाचा निर्माता इंग्लंडचे. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण हा निर्णय भारतीय गोलदाजांनी सपशेल चुकीचा ठरवत त्यांच्या संघाला २१३ धावांत गुंडाळल. या सामन्यामध्ये भारतीय कर्णधार कपिल देव यांनी ३ गडी बाद करून इंग्लंड संघाचे कंबरडे मोडले. भारताने हा सामना यशपाल शर्मा यांच्या ६१ आणि संदीप पाटील यांच्या ५१ धावांच्या बळावर ६ गडी राखून पूर्ण केले. 
         आणि अखेरीस ती वेळ आली होती. भारताला कमजोर संघ समजणाऱ्या जगाला दाखवून देण्याची , एक नवी ज्योत प्रज्वलित करण्याची... पण समोर लक्ष गतविजेत्या वेस्ट इंडिजचे. त्यांना अंतिम सामन्यांचा गाढा अनुभव होता. 
         कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या संघामध्ये जोश, उत्साह आणि बळ या सर्वांचं मिश्रण दिसत होते. भारतीय संघामध्ये गावसकर, श्रीकांत, मोहिंदर अमरनाथ, यशपाल शर्मा, संदीप पाटील कपिल देव असे फलंदाज तर बिन्नी मदनलाल संधू असे गोलंदाज होते. संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असल्याने संघ मजबूत वाटत होता.
     पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली गावसकर २ धावा करून माघारी फिरले. संघाची कमान ही श्रीकांत आणि अमरनाथ यांच्यावर आली. या सामन्यात श्रीकांत ३८ तर अमरनाथ २६ धावा करत बाद झाले. संपूर्ण विश्वचषक ज्यांनी गाजवला असे यशपाल शर्मा ११ धावा करून तंबूत परतले. संदीप पाटलांनी जरा फटकेबाजी करून २७ धावा करीत संघाला हातभार लावला. त्यानंतर कपिल देव, मदनलाल, किरमानी, संधू यांनी थोड्या थोड्या धावांचे योगदान देऊन बाद झाले. भारताने सर्व गडी गमावून फक्त १८३ धावा करण्यात यश मिळवलं होत पण वेस्ट इंडिज सारख्या संघासमोर त्या अपुऱ्या वाटत होत्या.
        वेस्ट इंडिज संघ जिंकण्याच्या हेतूने दुसऱ्या डावात आला खरा पण संघाच्या ५ धावा असताना सलामीवीर सर गॉर्डन बाद झाला.त्यानंतर देसमंड हेन्स आणि सर व्हीव रिचर्ड्स यांनी डावाची सूत्रे हातात घेतली. संघाच्या ५० धावा असताना हेन्स तर ५४ धावा असताना घातक व्हीव रिचर्ड्स ना माघार धाडण्यात भारताला यश आले. कपिल देव यांनी रिचर्ड्स यांचा अप्रतिम झेल घेत विश्वचषकाचे प्रतीक बनले.. त्यानंतर एका पाठोपाठ फलंदाज बाद होत गेले. मदनलाल आणि अमरनाथ यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.
        वेस्ट इंडिज ला १४० धावांत रोखण्याचा पराक्रम भारतीय संघाने केला होता. 
      मोहिंदर अमरनाथ यांना अष्टपैलू खेळीबद्दल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तसेच यशपाल शर्मा यांनी सर्वधित धावा तर बिन्नी यांनी सर्वाधिक गडी बाद करून विश्वचषकाचे मोलाचे योगदान दिले.
        अशा रीतीने भारताचे विश्वविजतेपदाचे स्वप्न साकार करण्यात कपिल देव यांच्या संघाला यश आले....
                                                                                                                           
World Cup Winning Team 1983
                                                                                                                            -चेतन जालिंदर गायकवाड

Comments

Popular posts from this blog

शब्द मनातले - वडील

आठवणी... खास क्षणांच्या....