गुरु....
गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः
गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः
शिक्षक म्हणजे केवळ वही पेन घेऊन शिकवणारा नव्हे तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग दाखवणारा मार्गदर्शक म्हणजेच शिक्षक होय....
आपल्या आयुष्यामध्ये शिक्षक हे जागोजागी भेटत असतात... एखाद्या व्यक्तीकडून काही चांगल म्हणजेच ज्ञान, बुद्धी आणि अनुभव यामध्ये वृध्दी करणाऱ्या प्रत्येकाला आपण शिक्षक म्हणू शकतो....
आपल्या आयुष्यातील सर्वांत पहिले गुरू असतात आपले आईवडील... आईवडील आपल्याला चालायला बोलायला तर शिकवतातच पण त्याचबरोबर आयुष्यात पुढे चालून येणाऱ्या प्रत्येक संकटांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवतात.
आपल्या आयुष्यामध्ये खूप शिक्षक येत असतात, प्रत्येक शिक्षक आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगल शिकण्याचा प्रांजळ प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्याच्या आयुष्याचे कसे सुंदर विणकाम करता येईल याकडेच त्यांचा कल असतो.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देऊन त्यांची एक सुंदर कलाकृती निर्माण करणाऱ्या या कलाकारांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा...
-चेतन जालिंदर गायकवाड
Comments
Post a Comment