कारण... मला विदूषक व्हायचंय...

आयुष्यात काहीतरी मनापासून लिहिण्याचा केलेला निस्वार्थी प्रयत्न...

कारण... मला विदूषक व्हायचंय...

इतरांच्या ओठांवर येणाऱ्या हास्याच कारण व्हायचंय...
डोळ्यातून ओघळणाऱ्या आनंदाश्रुंच साक्षीदार व्हायचंय...
कारण... मला विदूषक व्हायचंय...

दुःखी माणसाला आनंदी तर 
आनंदी माणसाला खळखळून हसवायचय...
कारण... मला विदूषक व्हायचंय...

इतरांचे दुःख वाटून घ्यायचेत अन् 
सुखाचे क्षण कसे आणखी सुखद करावे हे शिकवायचय...
कारण... मला विदूषक व्हायचंय...

सार काही जमवून आणयचय, 
उत्तमोत्तम विनोद करून इतरांना हसवायचय...
कारण... मला विदूषक व्हायचंय...

आतली घुसमट कमी करायचीय, 
इतरांना फक्त हसरा चेहरा दाखवत जगायचंय...
कारण...मला विदूषक व्हायचंय...

मला व्हायचंय विदूषक आणि 
करायचंय जगाला इतकं आनंदी की दुखातही कुणी रडताना दिसणार नाही...
घ्यायचाय वेध प्रत्येकाच्या हृदयाचा आणि पसरवायच हसू अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत...
  
                         - चेतन गायकवाड

Comments

Popular posts from this blog

शब्द मनातले - वडील

आठवणी... खास क्षणांच्या....