तो बाप असतो...
मुलांना आयुष्यभर सावलीत रहायला मिळावं
म्हणून जो आयुष्यभर उन्हात राबतो
तो बाप असतो...
मुलांना पोटभर खायला मिळावं
म्हणून जो स्वतः उपाशीच झोपतो
तो बाप असतो...
आयुष्यभर मुलांच्या सुखासाठी वण वण भटकून दुनियादारी च्या खचता खाऊन जो मुलांच्या प्रगतीची माफक अपेक्षा ठेवतो
तो बाप असतो...
आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे
जाण्यासाठी मुलांना तयार करतो
तो बाप असतो...
मुलांच्या सर्व चुका पोटात घेतो आणि
त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दाखवतो
तो बाप असतो...
आयुष्यभर मेहनतीने कष्टाने जीवन जगतो अन् कधी स्वतःच्या सुखसोयींनी विचार न करता आणि आपल्या मुलांना सर्व हसत हसत पुरवतो
तो बाप असतो...
आईविषयी खूप काही लिहिताना, ऐकताना वा वाचताना आपण वडिलांना मात्र विसरून जातो, विसरून जातो त्यांनी केलेल्या त्यागाला, प्रेमाला आणि शिस्तीला...
मात्र ते कधीच विसरत नाहीत मुलांना जीव लावायला कधी विसरत नाहीत त्यांची कर्तव्य आणि जबाबदारीला....
- चेतन जालिंदर गायकवाड
Comments
Post a Comment