काय चांगलं ???
काय चांगलं ???
काय चांगलं,
आयुष्यात सुटत गेलेल्या गोष्टींची वाट पाहणं चांगलं की,
समोर ठाकलेल्या सर्वोच्च सुखाला कवटाळणं चांगलं...
काय चांगलं ???
गरिबाच्या डोक्यावरील मोळी होन चांगलं की,
श्रीमंतांनी फेकलेली उष्टी पत्रावळी होन चांगलं...
काय चांगलं,
जीवनाला नवी दिशा देऊन उभारी घेणं चांगलं की,
आयुष्यभर एकाच व्यक्तीचा विचार करून कुढण चांगलं...
काय चांगलं,
जे आपल्याला लाथाडताय त्यांच्या पाठी धावणं चांगलं की,
जे आपल्यासाठी जीवाच रान करताय त्यांच्यासाठी जगणं चांगलं...
काय चांगलं,
नव्या उमेदीने जीवनाला आकार देणं चांगलं की,
लाचार होऊन कपाळावर टाळी मारण चांगलं...
काय चांगलं नी काय वाईट याचा विचार करण चांगलं की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक क्षण अन् क्षणाचा आस्वाद घेणं चांगलं...
- चेतन जालिंदर गायकवाड
Comments
Post a Comment