प्रवास


           बरीच लोकं याच उत्तर असही देतील की आम्हाला काही एकट्याने प्रवास आवडत नाही किंवा खूप जीवावर येतं किवा आम्ही मोबाईल मधे बघत बसतो चित्रपट... प्रवास कधी झाला कळतच नाही.... 
एकट्याने प्रवास खरच इतका कंटाळवाणा असतो का...?
          मला तरी नाही वाटत की एकट्याने प्रवास वैताग देणारा असतो याउपर मी अस म्हणेल की एकट्याने प्रवास करण ही तर एक पर्वणी आहे, धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःच्या विचारांना तेवढं गृहीत धरणं विसरूनच गेलाय त्यामुळे हीच ती वेळ असते जिथे आपण स्वतःशी बोलू शकतो, स्वतःची मतं जाणून घेऊ शकतो, घडून गेलेल्या आठवणींना ताजे करू शकतो, करू शकतो नियोजन की पुढे काय करायचंय, आयुष्य कस जगायचय... 
           प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन नक्कीच असू शकतो पण घडणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेणं हेच तर आयुष्य आहे...

                               - चेतन जालिंदर गायकवाड

Comments

Popular posts from this blog

शब्द मनातले - वडील

आठवणी... खास क्षणांच्या....