हे माझे प्रेम आहे...
हे माझे प्रेम आहे...
मी केलेलं प्रेम कसे आहे,
हे मला माहीत नाही.
कदाचित ते मोगऱ्याप्रमाने आहे,
सर्वदूर सुगंध दरवळवणारे,
बहुरंगी फुलांप्रमाने विविध छटांनी नटलेले
हे माझे प्रेम आहे...
की कदाचित ते नदीसारखे ही असेल,
डोंगरदऱ्यामधून सळसळ वाहणारे,
खडकांच्या ठेचा खात खात ही फक्त तुजला आनंद देऊ पाहणारे
हे माझे प्रेम आहे...
की ते पायातल्या घुंगरांप्रमाने आहे,
जिथे जिथे जाईल तिथे आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे आणि सर्वांना खुश करू पाहणारे
हे माझे प्रेम आहे...
कदाचित ते नारळाप्रमाणे आहे,
बाहेरून कठीण दिसत असले,
तरी आतून खूपच मऊ असून सर्वांना हवेहवेसे वाटणारे
हे माझे प्रेम आहे...
जणू चातक पक्षाप्रमाणे मी तुझी आणि फक्त तुझी वाट बघत राहील अगदीच आयुष्याच्या अखेरपर्यंत...
पण तुला हे माझे निस्वार्थ, निष्पक्ष प्रेम कळेल का?
Comments
Post a Comment