मनातील विचार..
आज सकाळी लवकर उठलो आणि चला म्हटल कुठेतरी गाडीवर भटकून येऊया, गाडीमध्ये पेट्रोल कमी होते, मग अस ठरल की आधी पेट्रोल टाकूयात आणि मग जाऊया म्हणून पेट्रोल टाकायला गेलो असता, 200 रुपयांचे पेट्रोल टाका म्हणून म्हटल नेहमीप्रमाणे शून्य बघायची सवय असल्याने मीटरकडे बघितले आणि त्याचबरोबर दिसले की पेट्रोल 101.30 रुपये. अक्षरशः धक्काच बसला कारण 200 रुपये देऊन तीन लिटर पेट्रोल घेणारे आम्ही दोन लिटर पेट्रोलची ही अपेक्षा करू शकत नाही याचं दुःख वाटल. आणि मग लक्षात आल की आपण अच्छे दिन जगत आहोत.
खरंच हे अच्छे दीन आहेत का ? की अच्छे दिनच्या नावाखाली सर्वात वाईट दिवस जगत आहोत...
प्रत्येक सरकार म्हणतंय की रुपयाला डॉलर पर्यंत नेण्याचा निर्धार आमचा आहे पण वर्षाअखेरीस आपण बघतो त्यातल अंतर अजूनच वाढत चाललाय.
ही गोष्ट खरंच दुर्लक्ष करण्यासारखी आहे का ?
Comments
Post a Comment