‍ मी वाचलेलं पहिलं पुस्तक - One Night @ Call Centre

         बऱ्याच दिवसांपासून विचार करत होतो की आपण इंग्रजीमधे सुधार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पण कसं? ते कळत नव्हत मग कुठेतरी बघितल की वाचणाने पूर्ण नाही पण काहीसा फरक नक्कीच पडेल, मग ठरवलं की वाचनाला सुरुवात करायची पण कुठून? कोणत पुस्तक वाचायचं? मग आठवलं एक नाव चेतन भगत. इंजिनीअरिंग कॉलेज मधे असताना एक भाषण त्यांचं ऐकलेल त्यामुळे एवढं तर माहीत होत की त्यांची पुस्तके छान असतात, हा पहिलाच प्रयत्न होता त्यामुळे एकतर पुस्तके वाचनाची आवड निर्माण होईल किंवा वाचनाची इच्छाच निघून जाईल, नेहमीप्रमाणे गूगल वर शोधल तर एक पुस्तक दिसल तिथे One Night at Call Centre.
       नाव वाचून कुणालाही जाणून घ्यायची इच्छा निर्माण व्हावी असं...  पुस्तक मागवलं जे की मला चार दिवसात भेटलं म्हणजे मंगळवारी दुपारी... पुस्तक आल खर पण वाचायची इच्छा कुठून आणायची हा मोठा यक्षप्रश्न होता, मग मनाशी निर्धार केला की एक दोन पाने वाचून बघुयात अन् अस करत सुरुवात केली...
       सुरुवातीपासून पुस्तक इतक्या मनोरंजक पद्धतीने लिहिलंय की समोर  चित्रपट बघितल्याचा भास व्हावा.. कथा आहे एका रात्रीची, सहा पात्रांची, जे की एका कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या सर्वसाधारण लोकांची...
       प्रत्येक पात्राची एक वेगळी गोष्ट आहे, प्रत्येक पात्र वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या विचारांचे... आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींचे एक संक्षिप्त स्वरूप या कथेमधून आपल्या समोर येते... यातील कुठल्यातरी पात्राशी वाचक स्वतःला प्रतिबिंबित करू शकतो, त्यांच्या मनात होणारी घालमेल ही आपल्याच होते अस वाटून जाते, आयुष्यात संकटे येतात पण प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे हे सांगणारी कथा..
        पुस्तक अगदीच सर्वांनी आवर्जून वाचावे असे...

Comments

Popular posts from this blog

शब्द मनातले - वडील

आठवणी... खास क्षणांच्या....