शब्द मनातले

        बसमधून ज्यावेळी प्रवास करतो ना तो फक्त रस्ता कापण्यासाठी नसतो तर आजचा दिवस कसा होता, काय काय आपण चांगले क्षण जगलोय याचा पुन्हा एकदा आनंद घेऊ शकतो.
        आजचा दिवस तसा खूपच सुंदर होता, आता कुठे कॉलेजला आल्यासारखं वाटायला लागलंय, नवनवीन माणसे भेटत आहेत, नवीन अनुभवांची भर पडत आहे, ज्ञान वाढत आहे यात शंका नाही. आजचा दिवस तसा इतर दिवसांप्रमाणेच होता, नवीन आहे ते आजची वर्गप्रतीनिधी निवडण्याची प्रक्रिया.
        खरतर एक विद्यार्थी खूपच इच्छुक होता पण बाकीच्यांच त्याच्याबद्दलच फारस चांगल मत नव्हतं वर्गप्रतीनिधी होण्याकरिता, यामागच कारण होत की तो खूप जास्तच पुस्तकीकिडा आहे सर्वांना शंका आहे की हा आपले प्रश्न मांडू शकेल की शिक्षकांचे निर्णय आपल्यावर लादेल, तरी लोकशाही पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरले त्याच्या विरुद्ध एक दुसरा मुलगा उभा करण्यात आला जो की आज गैरहजर होता म्हणून ऑनलाईन च पोल करूया आणि सुरुवातीच्या मुलाला जाणीवपूर्वक पाडण्याचा निर्णय झाला अगदीच मुलींसह. हे सगळ सुरू असताना मी नेमक कुठे असा प्रश्न नक्कीच पडू शकतो. या सगळ्या गदारोळात आरामात या सर्व गोष्टींचा आनंद घेत त्यावर विनोदी टिप्पणी करण्याचे काम नेहमीप्रमाणे माझ्या वाट्याला आल्याने अगदीच खुश होतो. काही विद्यार्थी मलाच वर्गप्रतिनिधी हो असा सल्ला देत होते, आणि अगदीच ज्या विद्यार्थ्याला वर्गप्रतिनिधि व्हायचे होते त्याच्यापेक्षा चांगल मी सर्वांना स्वतःची बाजू मांडून विश्वासात घेऊ शकतो याची खात्री मला होती, द्विधामनस्थिती काय असते याचा प्रत्यय आला, मनातून अगदीच वाटल की व्हायला काही हरकत नाही पण....
        हा पण डोक्यात आला न या मनातून आलेल्या विचाराला बुद्धीने नकार दिला...
        एम बी ए कॉलेज मधे प्रवेश घेतल्यानंतर शिकण्याची सुरुवात होईल असं वाटल नव्हत पण आता वाटतंय की या दोन वर्षात निर्णयक्षमता नक्कीच बळावेल....
          चला स्टॉप आला बघुया पुढच्या प्रवासात काय काय मनात येतय...
                                  - चेतन जालिंदर गायकवाड 

Comments

Popular posts from this blog

शब्द मनातले - वडील

आठवणी... खास क्षणांच्या....